Free Ration Scheme : जर तुम्हीही सरकारच्या मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण मोदी सरकारने कोरोना काळा मध्ये सुरु केलीली ही योजना पुढील एक वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे.
शिधापत्रिकेच्या यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी
योजना कधी सुरु झाली होती?
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे की, मार्च 2020 मध्ये ज्या वेळेस कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला 4 किलो गहू तसेच 1 किलो तांदूळ मोफत दिला जातो. देशा मधील सुमारे 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. ही महत्त्वाची योजना पुढे नेल्यास सरकारला वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे.
आता 2023 पर्यंत मुदतवाढ
सुरुवातीला ही योजना (मोफत रेशन योजना) फक्त 3 महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती, परंतु नंतर ती 3-3 महिने सुरू ठेवण्यात आली होती. या योजनेचे आतापर्यंत 7 टप्पे पूर्ण झाले आहेत. यावर्षी मार्च 2022 मध्ये ही योजना 6 महिन्यांसाठी म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर, ती पुन्हा 3 महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता सरकारने या योजनेला थेट एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे.
मोफत रेशन कार्ड योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी
विरोधकांसाठी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक?
राजकीय विश्लेषक सरकारच्या या हालचालीला 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मास्टर स्ट्रोक मानत आहेत. तज्ञांच्या मते, आता ही योजना (मोफत रेशन योजना) डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.